

ajit pawar
esakal
Guardian minister Beed: मला कोणी कधीच बीडच्या रेल्वेबाबत आग्रह धरलेला नव्हता. पण, मला कामाची आवड आहे. त्यामुळेच मी रेल्वेचा मुद्दा हाती घेतला असून येत्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड या लोहमार्गावरुन रेल्वे धावणार, असे पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगणाऱ्या अजित पवारांनी आपला शब्द खराही करुन दाखविला. ता. १७ सप्टेंबर २०२५ रोजी ४५ वर्षांचे बीडकरांचे स्वप्न रुळावरुन धावले.