Political News : वंचित बहुजन आघाडी-राष्ट्रवादीची युती होणार? प्रकाश आंबेडकरांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar Prakash Ambedkar

शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युती होणार अशी चर्चा रंगली असतानाच आता यात राष्ट्रवादीनं एन्ट्री केलीय.

Political News : वंचित बहुजन आघाडी-राष्ट्रवादीची युती होणार? प्रकाश आंबेडकरांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

राज्यात शिंदे गटानं भाजपशी (BJP) हातमिळवणी करत उद्धव ठाकरेंचं सरकार खाली खेचलं आणि आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील राजकारण पुरतं ढवळून निघालं आहे. तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते.

त्यामुळं शिवसेना (Shiv Sena) आणि वंचित बहुजन आघाडी युती होणार अशी चर्चा रंगली असतानाच आता यात राष्ट्रवादीनं एन्ट्री केलीय. प्रकाश आंबेडकरांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय. आघाडीसाठी यापूर्वीही आम्ही आंबेडकरी चळवळीतील रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, गवई यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असं अजित पवारांनी म्हटलंय.

हेही वाचा: जतनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यावर दावा; देवेंद्र फडणवीसांनाही थेट चॅलेंज

अजित पवारांनी विधान भवनात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत पत्रकारांनी त्यांना विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले, भाजपाचा पराभव व्हावा, मतांची विभागणी होऊ नये म्हणून समविचारी लोक एकत्र येऊन तयारी करत आहेत. परंतु, तयारी एका बाजूनं चालत नाही, तर दोन्ही बाजूंची तयारी हवी, असं त्यांनी आपलं मत मांडलं. यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केलं.