
राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात नवी चाल खेळल्याची चर्चा रंगली आहे. भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटेंना बळ देण्यात आलं असल्याचं बोललं जातं. विशेषतः खातेवाटपात कोकाटेंना कृषीमंत्री पद मिळाल्यानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे.