Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा खेळखंडोबा केला; त्यांच्याकडे लक्ष देऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा खेळखंडोबा केला; त्यांच्याकडे लक्ष देऊ नका

Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा खेळखंडोबा केला; त्यांच्याकडे लक्ष देऊ नका

राज्यातील विकासकामांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केलंय. या अगोदर दसरा मेळाव्याच्या भाषणावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. दरम्यान आता शिंदे सरकारच्या गलथान कारभारावर अजित पवार यानी ताशेरे ओढले आहेत. बारामतीतील एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच काय चाललंय याकडे लक्ष देऊ नका, त्यापेक्षा आपल्या शेतात कामात लक्ष द्या. अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद गेलं आता त्याचं काय होणार?, असा विचारचं करू नका, अजित पवार तेव्हा पण काम करत होता आणि आताही काम करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखालील राज्यातील सरकारने लोकशाहीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. अधिकाऱ्यांनाही कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही, हे कळत नाही. अशा राजकीय स्थितीमुळेच राज्यातील विकासकामांवर परिणाम होत असल्याचंही अजित पवार म्हणालेत.