चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? अजित पवारांचा CM शिंदेंना सवाल: Ajit Pawar Eknath Shinde varsha bangla mumbai maharashtra politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ajit Pawar

Ajit Pawar: चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? अजित पवारांचा CM शिंदेंना सवाल

चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? असा सवाल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी सुरु असलेल्या खर्चावर भाष्य करत टीकास्त्र सोडले आहे.

अधिवेशनापुर्वी बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांसी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. वर्षा बंगल्याच्या खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख आहे. असे सांगत चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

काय म्हणाले अजित पवार?

स्वतःचे हसरे फोटो दाखवण्यासाठी कोटींच्या जाहिरातींचा घाट घालतात. जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च सुरुय. वर्षा बंगल्याच्या खानपानाचं बिल अडीच कोटी येतय. चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? असा संतप्त सवाल पवार यांनी यावेळी विचारला.

सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. तिजोरीचा विचार न करता निव्वळ मंत्री आणि त्यांचे ठराविक आमदाराच्या मतदारसंघात करोटी रुपयांची कामे जाहिर करतात. परंतु इतका निधी त्यांच्याकडे द्यायाला नाही. ही एक फसवणुक आहे. इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरु आहे.

वर्षा बंगल्यावरील खानपानाचं चार महिन्याचं बिल २ कोटी ३८ लाख इतकं आहे. मी पण मुख्यमंत्री होतो. माझेही सहकारी मित्र मुख्यमंत्री होते. काय या चहामध्ये सोन्याचं पाणी घातलं होत का? असा सवाल उपस्थित करत हे कळायला मार्ग नाही, असे पवार म्हणाले.

गेल्या ८ महिन्यात जाहिरातींवर सरकारकडून ५० कोटी खर्च करण्यात आला आहे. आणि मुंबई महापालिकेकडून माहिती घेतली तर तिथून १७ कोटी रुपयेंपेक्षा जाहिरातींवर खर्च केला आहे. जाहिराती देऊन स्वतःचा टेंबा मिळवण्याचं काम सुरु आहे. अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

तसेच, विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाहीये. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

यासोबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या चहापानांच निमंत्रणाला नकार दिला आहे. विरोधकांकडून चहापानांच निमंत्रणावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.