Maratha Reservation : अजित पवारांचे दोन शिलेदार देणार राजीनामा? मराठा आरक्षण आंदोलन पेटलं

राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.
ajit Pawar Faction leaders mla atul benake dilip mohite patil on resignation over maratha reservation
ajit Pawar Faction leaders mla atul benake dilip mohite patil on resignation over maratha reservation Esakal
Updated on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे.

यादरम्यान शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे, यानंतर अजित पवार गटातून देखील दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

हेमंत पाटील काय म्हणालेत?

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी पत्रामध्ये म्हटलं की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

ajit Pawar Faction leaders mla atul benake dilip mohite patil on resignation over maratha reservation
Mla Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांचं नवं वेळापत्रक मान्य होणार? आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार

हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. तालुक्यातील समाज बांधव आणि मराठा समाजाच्या संघटना जसं सांगतील तसा निर्णय मी घेणार आहे, असे अतुल बेनके म्हणाले.

ajit Pawar Faction leaders mla atul benake dilip mohite patil on resignation over maratha reservation
Maratha Reservation: मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण भाजप नाही तर काँग्रेसने दिले ;माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील राज्याचं राजकारण मराठा समाजाच्या हातामध्ये होतं. केंद्रामध्ये देखील मराठा समाजाचे अनेक मंत्री होते. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा समाजाकडून होणारी राजीनाम्याची मागणी ही योग्य असं मत व्यक्त केलं आहे.

मराठा समाजाची भावना लक्षात घेता आमच्यातील काही नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे, असेही मोहिते पाटील म्हणाले. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

तसेच मराठा आरक्षणासाठी खासदारांनी संसदेत, तर आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा. परंतु केवळ लोकांचे समाधान व्हावं, तसं बोलून राजीनामा देण्याची भाषा करावी आणि भुमिका वेगळी घ्यावी हे पटत नाही. आमदारकी आणि खासदारपदाचा राजीनामा देणाऱ्या नेत्यांना संधीसाधुची उपमा देत दिलीप मोहिते पाटीलांनी निशाना साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com