Supriya Sule: सत्तारांच्या वादग्रस्त विधानावर अखेर अजित पवार बोलले; म्हणाले, विनाश... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar and Abdul Sattar

Supriya Sule: सत्तारांच्या वादग्रस्त विधानावर अखेर अजित पवार बोलले; म्हणाले, विनाश...

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणातील टीका टिप्पणीची पातळी खालावली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील अनेक नेते सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यात आघाडीवर आहेत. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आली. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar news in Marathi)

हेही वाचा: Shraddha Murder Case : आई-वडिलांसोबतच्या शेवटच्या संवादात श्रद्धा म्हणाली, विसरा मी तुमची मुलगीये अन् तिनं..

अजित पवार पुढं म्हणाले, काहीही बोलायला तुम्ही नागरिक नाहीत. तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात. मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतली आहे. तुमच्यावर जबाबदारी आहे. मध्यंतरी मंत्री अब्दुल सत्तार आमच्या भगिनीविषयी वादग्रस्त विधान केलं. याला विनाशकाले विपरीत बुद्धी, हेच म्हणता येईल. काय आपण बोलतोय, कशा पद्दतीने बोलतोय, आपल्याला मंत्री केलं म्हणजे सर्वकाही झालं का? मंत्रीपद येतात, जातात कोणी आजी असतं कोण माजी असतं मात्र संविधान कायदा, घटना नियम पाळले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढं म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने वाचाळवीरांना आवरावं. शिंदे-भाजप सरकारमध्ये वाचाळवीर जास्त आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांन यात लक्ष घालावं. यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होतेय, असा इशाराही पवार यांनी दिला.

हेही वाचा: Shivsena: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! आता धनुष्यबाणासंदर्भात दिल्ली हायकोर्टानेही...

याआधी २०१८ साली पुरंदरचे आमदार आणि तत्कालीन मंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अशाच प्रकारे टीका केली होती. त्यावेळी अजित पवार चांगलेच संतापले होते. अजित पवार म्हणाले होते की, विजय शिवतारे पोपटासारखे लैच बोलतात. अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती, तुझा अवाका किती? तु बोलतो कोणाबरोबर? तुला दाखवतोच तु २०१९ला कसा आमदार होतो, असं उघड आव्हान अजित पवार यांनी दिलं होतं. तसेच अख्ख्या महाराष्ट्राला ठावूक आहे की, मी कोणाला पाडायचं ठरवलं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही, असंही अजित पवार म्हणाले होते. शिवाय अजित पवार यांनी शिवतारे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता.