कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला नरकातच जावं लागेल; अजित पवार संतापले I Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

बेधडक, सडेतोड वक्तव्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी चर्चेत असतात.

कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला नरकातच जावं लागेल; अजित पवार संतापले

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचे (Satara Government Rest House) उद्घाटन करण्यात आले. विश्रामगृहाच्या बांधकामावरून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं असल्याचं समोर आलंय. यावेळी त्यांनी आत जाऊन विश्रामगृहाची पाहणी केली. सर्व खोल्यांमध्ये बसवण्यात आलेले डबल बेड, लाईटचे स्पॉट अशा अनेक गोष्टींवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी चक्क स्वच्छतागृहातील फ्लश व्यवस्थित चालतात की नाही, याचीही पाहणी केलीय.

बेधडक, सडेतोड वक्तव्यामुळं आणि आपल्या कार्यपद्धतीमुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी चर्चेत असतात. एखादं काम आवडलं नाही तर अधिकाऱ्यांची जागीच कानउघाडणी केल्याचंही आपण अनेकदा पाहिलंय. अशीच घटना साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी घडली. अजितदादांनी विश्रामगृहाच्या बांधकामावरुन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. यानंतर भर सभेत स्टेजवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत हे कामच आवडलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. नूतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार चेचाच करून टाकला आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: ताजमहालात शौचालयाजवळ हिंदू देवतांची छायाचित्रं; मत्स्येंद्र गोस्वामींची ASI ला धमकी

उपमुख्यमंत्री पवार अधिकाऱ्यांना म्हणाले, बाबांनो.. तुम्हाला आम्ही दीड लाख कोटी रुपये पगार आणि निवृत्ती वेतन देतो. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्सचा तो पैसा असतो. ती कामं तरी चांगली करा. “कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल, असा जणू शापच त्यांनी दिलाय. काही काही अधिकाऱ्यांना वाटत असतं की, हा सारखाच दम देत असतो. चांगलं काम केल्यानंतर तुमचं कौतुकही करेन ना, अशा शब्दांत पवारांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

Web Title: Ajit Pawar Got Angry With The Officer Over The Construction Of Government Rest House In Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraAjit Pawar
go to top