Abdul Sattar
Abdul Sattar

Abdul Sattar : खातं बदलून देण्याची, विनंती आधीच केली होती; खातं बदलल्यानंतर सत्तार यांचे विधान

Published on

मुंबई - राज्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज पार पडले. यामध्ये शिवसेनेकडे असलेली काही खाती खाती अजित पवार गटाला देण्यात आली. त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले महत्त्वपूर्ण असे कृषी खाते अजित पवार गटाकडे सोपविण्यात आले आहे. यावर आता सत्तार यांची प्रतिक्रिया आली आहे.

Abdul Sattar
Dada Bhuse : कृषी खाते अजित पवार गटाकडे; मंत्री दादा भुसे म्हणाले, चांगलं काम...

सत्तार म्हणाले, अपेक्षेप्रमाणे नागपूरच्या अधिवेशनात सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खाते बदलून देण्याची विनंती केली होती. धनंजय मुंडे माझ्यापेक्षा चांगलं काम करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच अल्पसंख्यांक खात्यातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सत्तार यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या योजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, माझी एक इच्छा होती की, शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा उपलब्ध करून द्यावा, ती मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली. पीएम किसान योजना आणि राज्याने सहा हजार द्यावे, ती योजना आणि राशन कार्डबाबतच्या योजनेची अंमलबजावनी झाली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कंपनीच्या माध्यमातून राबविली जात होती. ती योजना मी कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली. (Marathi Tajya Batmya)

Abdul Sattar
Ajit Pawar Portfolio : शिंदे गटाकडील 3 अन् भाजपकडे असलेले 'हे' 6 खाते अजित पवार गटाला मिळाले

अनेक कार्यक्रम माझ्या कार्यकाळात पार पडले. माझ्या प्रयत्नांना सर्व मंत्र्यांनी मदत केली. शेतकऱ्यांच्या भावना माझ्या कामाशी जोडल्या आहेत. नोकरभरतीचं कामही प्रगतीपथावर सुरू आहे. सरकारने अत्यंत वेगाने काम केल्याचही त्यांनी नमूद केलं. सत्तार यांच्याकडे आता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com