esakal | अजितदादांनी फडणवीसांच्या कामावर समाधानी होऊनच घेतली होती उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 
sakal

बोलून बातमी शोधा

अजितदादांनी फडणवीसांच्या कामावर समाधानी होऊनच घेतली होती उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 

सोलापूर ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पक्षातील 90 टक्के लोक अजित पवारांच्या कामावर समाधानी असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केले होते. परंतु, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षात केलेल्या कामावर समाधानी होऊनच भाजपच्या विचाराबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती हे उमेश पाटील यांना ठाऊक नाही का? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

अजितदादांनी फडणवीसांच्या कामावर समाधानी होऊनच घेतली होती उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पक्षातील 90 टक्के लोक अजित पवारांच्या कामावर समाधानी असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केले होते. परंतु, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षात केलेल्या कामावर समाधानी होऊनच भाजपच्या विचाराबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती हे उमेश पाटील यांना ठाऊक नाही का? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यावर अजित पवारांना सल्ला देण्याइतपत पात्रता नाही, अशी टीका केली होती. त्याला श्री. देशमुख यांनी चोख उत्तर दिले आहे. उमेश पाटील जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांना भाजप प्रदेशाध्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी पाटील यांनी हा खटाटोप केला आहे. कोथरूडच्या मतदारांनी बाहेरून येऊन पाटील यांना निवडून दिले. पक्षाचे व त्यांचे स्वतःचे काम असल्याशिवाय पुण्याच्या सुज्ञ मतदारांनी त्यांना निवडून दिले का? त्यामुळे त्यांना उपरा उमेदवार म्हणण्याचा आपणास काय अधिकार आहे. चंद्रकांत पाटील यांनी सलग दोनवेळा पुणे पदवीधर मतदारसंघ विक्रमी मतांनी जिंकला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते. त्यांचा प्रचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार, खासदारांनी केला होता. पण राष्ट्रवादीला अपयश आले. हे का घडले याचे आत्मचिंतन उमेश पाटील यांनी करावे. उमेश पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीत नाव न आल्यावर या सर्व आरोपांचा पश्‍चाताप नक्कीच होईल असेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.