Ajit Pawar : सभागृहात आमचंही चुकलं; अजित पवारांनी मान्य केली 'ती' चूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar News

Ajit Pawar : सभागृहात आमचंही चुकलं; अजित पवारांनी मान्य केली 'ती' चूक

मुंबईः अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. कामकाज सुरु असतांना झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना परवा सुरत कोर्टाने मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. काल लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली. काल आणि आज राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर बसून राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं. राहुल यांच्या प्रतिमेला जोडे मारुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केलं.

त्यानंतर सभागृहातदेखील गोंधळ झाला. सत्तापक्षासह विरोधकांनीही जागेवरुन उठत गदारोळ केला. मग विरोधकांनी सभात्याग केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपल्या नेत्याचा सर्वांनाच अभिमान असतो. अशा पद्धतीने आंदोलन करणं चूकच आहे.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

ते पुढे म्हणाले की, यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली मात्र काहीही उपयोग झाला नाही. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली आहे. आमच्याकडूनही घोषणाबाजी झाली. तेही चुकीचंच होतं. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याची आमची मागणी होती. मात्र मागणी मान्य केली नसल्याने आम्ही सभात्याग केल्याचं अजित पवारांनी सांगितलं.