Ajit Pawar : ...म्हणून अजित पवार अमित शाहांच्या दौऱ्याला अनुपस्थित होते; स्वतःच सांगितलं कारण

NCP Ajit Pawar
NCP Ajit PawarEsakal
Updated on

मुंबईः शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शाहांनी तब्बल ४५ मिनिटं चर्चा केली.

अमित शाहांच्या दौऱ्यामध्ये सर्वात जास्त चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे अजित पवारांची अनुपस्थिती. भाजपचे देशातले दुसरे मोठे नेते राज्यात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अनुपस्थित कसे? असा प्रश्न दिवसभर उपस्थित होत होता. त्यावर आज अजित पवार यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलेलं आहे.

NCP Ajit Pawar
Mumbai Airport : मुंबई विमानतळावरुन एकाच दिवशी २५० विमानांचं उड्डाण होणार रद्द; नेमकं कारण काय?

माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शनिवारी दिवसभर बारामतीमध्ये विविध बैठकांना उपस्थिती लावल्याचं सांगितलं. तो कार्यक्रम पंधरा दिवस आधीच ठरला होता. त्यामुळे आपण याबाबत अमित शाह यांच्या कार्यालयाला तशी माहिती दिली होती, असं त्यांनी सांगितलं.

NCP Ajit Pawar
Ajit Pawar : "माझं ते काम नाही..."; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या त्या फोटोवर अजित पवार स्पष्टच बोलले

काय म्हणाले अजित पवार?

२३ तारखेला मी बारामतीला वेळ दिलेली होती. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ शकलो नव्हतो. बारामती येथील पाच महत्त्वाच्या संस्था सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी-विक्री संघ, बारामती दूध संघ आणि बाजार समिती; यांच्या जनरल बॉडीची मीटिंग होती. या बैठकांचा अजेंडा पंधरा दिवस आधीच ठरलेला होता. त्यामुळे मला अमित शाहांच्या दौऱ्यामध्ये जाता आलं नाही.

अजित पवार पुढे म्हणाले की, दौऱ्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, याबाबत मी अमित शाह यांच्या कार्यालयाला कळवलं होतं. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर घातलं होतं, असं पवारांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आज अजित पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. ते विविध गणेश मंडळांना भेटी देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com