
Ranjeet Kasle: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर होती, असा दावा करुन रणजित कासलेंनी खळबळ उडवून दिली होती. एवढंच नाहीतर मतदानाच्या दिवशी आपल्या खात्यावर १० लाख रुपये पाठवण्यात आलेले होते, ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड करण्यासाठी हे पैसे दिले होते, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं.