ajit pawar plane crash
esakal
महाराष्ट्र बातम्या
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा शेवटचा फोन राणा जगजितसिंहांना! बोलणं झाल्यानंतर काही मिनिटांत झाला अपघात; म्हणाले...
Ajit Pawar's Last Phone Call: राणा जगजितसिंह यांना अजित पवार यांनी शेवटचा फोन केला होता. त्यानंतर केवळ अर्ध्या तासामध्ये बारामती विमानतळाजवळ विमान कोसळलं आणि अपघात झाला.
Ajit Pawar Death News: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये बुधवारी सकाळी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनावर उत्तम पकड असलेला आणि राजकारणाची जाण असलेला नेता हरपल्याची सर्वांचीच भावना आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने एक दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे तर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

