esakal | अजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे.  

अजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार आपल्या पदाची राजीनामा देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे.  

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

अजित पवार यांचे चांगले संबंध असलेले राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार हे सध्या मुंबईत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांनी अद्याप शपथविधीनंतर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अजित पवार आता काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार पदाचा राजीनामा देणार हे आता निश्चित मानण्यात येत आहे.

अमृता फडणवीस म्हणतात, फडणवीस-अजित पवारांनी करून दाखवलं!