Raj and Uddhav Thackeray
Raj and Uddhav Thackeray

Raj and Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल, राज-उद्धव एकत्र येणार?

Raj and Uddhav Thackeray : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील फोडण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्रातील या राजकीय भुकंपानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रव यावे अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्रातील राजकीय भुकंपानंतर मनसेकडून शिवसेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. आता तरी एकत्र या, अशी मागणी या बॅनरवर करण्यात आली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या राज-उद्धव यांच्यासोबत फोटो लावण्यात आला आहे.

Raj and Uddhav Thackeray
Supriya Sule : मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाई होणार; सुप्रिया सुळेंनी दिले संकेत
Raj and Uddhav Thackeray
Raj and Uddhav Thackeray

महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला. राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

सोशल मिडीयावर सुद्धा राज-उद्धव एकत्र यावे अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.शिवनसेना भवन परिसरातील या बॅनरची आता जोरदार चर्चा होत आहे. 

Raj and Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : अजित पवार उपमुख्यमंत्री, फडणवीसांना केंद्रात संधी? 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com