Ajit Pawar दौरा रद्द करुन मुंबईत? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; म्हणे ‘रात्र वैऱ्याची आहे’

Ajit Pawar
Ajit PawarSakal

Ajit Pawar NCP Leader News

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी पुणे दौरा रद्द करुन मुंबईला रवाना झाले आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. अजित पवार सध्या कुठे आहेत, त्यांनी ‘अचानक’ दौरा रद्द का केला, असे प्रश्न उपस्थित होत असून 'रात्र वैऱ्याची आहे', पहाटे पुन्हा एकदा शपथविधी होणार का अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती. तर दुसरीकडे अजित पवार हे शनिवारी पुण्यात परत येणार आहेत, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिलीये.

Ajit Pawar
Crime News : राजकीय नेत्यांना धमकी देणारा अखेर जेरबंद

अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्याला शुक्रवारी सुरूवात झाली. त्यांनी सकाळी पक्ष पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकादेखील घेतल्या. मात्र, दुपारी अजित पवार यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यांनी कॉन्व्हॉय देखील सोडला. यामुळे संभ्रम निर्माण झाला. अजित पवारांच्या निकटवर्तीयांना देखील याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे संध्याकाळपासून राजकीय वर्तुळात अजित पवार नेमके कुठे गेले, याबाबत चर्चा सुरु होती. रात्री ट्विटरवरही याबाबत चर्चा सुरू झाली. अनेकांना पहाटेचा शपथविधी आठवला तर स्वयंघोषित राजकीय विश्लेषकांनी 'अंदाज' वर्तवत चर्चेला खमंग फोडणी दिली.

सोशल मीडियावर नेमकी चर्चा काय?

अयोध्या की गुवाहाटी असं सौरभ केसरकर या ट्विटर युजरने म्हटलंय. तर 'सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची शक्यता असून सध्याच्या घडामोडी पाहता निकाल काय येईल, याचा अंदाज येतोय', असं एका युजरने म्हटलंय.

Ajit Pawar
Sharad Pawar : 'हिंडेनबर्ग' प्रकरणात जेपीसीची मागणी निरर्थक', पण... ; शरद पवार यांचं मोठं विधान

अजय नगरे या तरुणाने म्हटलंय की, तुम्ही आता झोपा, सकाळी पाचला उठा. तर समीत ठक्कर या युजरने अजित पवार हे सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचा दावा केला. यानंतर अजित पवार नॉट रिचेबल होण्यामागे कोव्हिडचा अँगल असावा अशी शक्यताही वर्तवली. विशेष म्हणजे, समीत ठक्कर यांना नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे हे देखील फॉलो करतात.

Ajit Pawar Twitter Reaction
Ajit Pawar Twitter ReactionSakal Digital

अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे काय?

पुण्यातील कार्यक्रम अर्धवट सोडून अजित पवार मुंबईला रवाना झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. अजित पवार यांचे शनिवारी पुण्यात नियोजित कार्यक्रम आहेत आणि यासाठी ते परत येणार आहेत, असंही सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com