esakal | अजित पवार कधी कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत - जंयत पाटील | Jayant patil
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Jayant Patil

अजित पवार कधी कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत - जंयत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: "भाजपाचे पुढारी आमच्या नेत्यांचे नाव घेतात. त्याच्या पाठोपाठ ईडी, सीबीआय येते. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. भाजपाने राष्ट्रवादीचा इतका धसका का घेतलाय?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी विचारला आहे. जरंडेश्ववर साखर कारखाना आणि अजित पवारांशी संबंधितांवर सीआरपीएफच्या सुरक्षेत इन्कम टॅक्सने छापेमारी केली, त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

"आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांना असाच त्रास दिला. पण न्यायायलाये त्यांना न्याय दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गैरव्यवहार केलेला नाही. त्यांना बदनाम करणं एवढाच हेतू आहे. धाड घालून सनसनाटी निर्माण करणे एवढाच उद्देश आहे" असे जयंत पाटील म्हणाले.

"अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रे दडवली नाही. ते कधी कुठलीच कागदपत्रे दडवत नाही" असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. "लखीमपूर दुर्घटनेला भाजप जबाबदार आहे. शेतकरी पेटून उठला आहे. तिन्ही पक्षाची ताकद मोठी आहे. आम्ही एकत्र लढलो नाही. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत अपयश आले. येणाऱ्या काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढू. एकत्रित लढलो तरच आमची ताकद जास्त आहे. भविष्यात आम्ही जिथे शक्य असेल त्या महापालिका एकत्र लढणार" असे जयंत पाटील म्हणाले.

loading image
go to top