Maha Vikas Aghadi: वंचित बहुजन आघाडीशी युतीबाबत अजित पवार यांचं मोठं विधान म्हणाले..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maha Vikas Aghadi

Maha Vikas Aghadi: वंचित बहुजन आघाडीशी युतीबाबत अजित पवार यांचं मोठं विधान म्हणाले..."

Maha Vikas Aghadi: सध्या कोणत्या पक्षातील नेते दुसऱ्या कोणत्या पक्षात जातील याचा काही नेम उरला नाही. शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे असे दोन गट पडले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी भाजप सोबत युतीच सरकार स्थापन केलं त्यानंतर इतर पक्षातील नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा शिंदे गटाकडे वाढला आहे. (Shiv Sena ncp Indian National Congress)

तर महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडीशी युतीसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले होते. त्यामुळे राज्यात चर्चांना उधान आलं होतं. त्यातच आता विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Eknath Shinde: शिंदे गटाचा कामाख्या देवीचा नवस फिटणार

ते म्हणाले की "प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करण्यासाठीचे प्रयत्न यापूर्वी आम्ही अनेकदा केले होते. दिवंगत आर. आर. पाटील यांनी याविषयी आंबेडकरांशी चर्चाही केली होती. आताही आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार आहोत" अस मत अजित पवारांनी केलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीला भिम शक्तीची ताकद मिळणार का असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे.

एकीकडे आंबेडकर-ठाकरे युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. शिंदे गट आणि दलित पँथरची युती होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ही युती होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.