
अजित पवार म्हणाले, 'कुणी कुठं काय म्हणावं हा ज्याचा त्याचा अधिकार, पण..'
नाशिक : राज्यात शिवसेना विरूध्द रवी राणा आणि खासदार नवनित राणा असा संघर्ष पाहायला मिळाला. या दरम्याना सरकारविरोधात आव्हान दिल्याबरोबरच मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर नाशिक येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रीया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, काल आम्ही सगळे कोल्हापूरमध्ये होतो, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री मुंबईत होते. यातच अमरावतीचे खासादार आणि आमदार या दोघांनी निर्णय घेतला मातोश्रीला येऊन तिथं प्रार्थना म्हणणार आणि हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्णय घेतला, कुणी कुठं काय म्हणावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमधील अधिकार आहे त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. पण ज्याच्यातून नवीन कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आहेत, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही गृह विभागाची असते.
कधी कधी आम्हाला पण सांगितलं जातं की,अमुक कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ नका तिथलं वातावरण तंग आहे, तिथं नवीन प्रश्न निर्माण व्हायला नको असं पोलिस सांगतात तेव्हा आम्ही ते ऐकतो. पोलिसांनी त्यांना देखील तसं सांगितलं. जेव्हा तुम्ही एका पक्षाच्या नेतृत्वाच्या घराजवळ जाऊन हे सगळं करायचं म्हणता, ज्यांना कुणाला देवधर्म करायचं त्यांनी आपल्या घरामध्ये करावा, देवस्थानात किंवा श्रध्दा असेल तिथं जावं, संविधानानं सर्वाना सर्व प्रकारच्या मुभा दिलेल्या आहेत, त्या कायद्याच्या नियमांच्या चौकटीत राहूण, पोलिसांना सांगितलं होतं की ऐऊ नका तरी ते आले, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
अजित पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, शिवसैनिकांना आमच्या नेत्याच्या परिसरात का आले असं वाटून जे व्हायला नको होतं ते झालं, पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की हे वाढवू नका, त्यांनी प्रेस पण घेतली पंतप्रधान येतायत असं असताना आम्ही हे थांबवतो, पुन्हा काहीना काही प्रश्न निर्माण होत होते. काही लोकांच्या भावना तीव्र झाल्या आणि शिवसैनिक त्यांच्या घरी गेले, काही कारणाने पोलिस स्टेशन मध्ये बोलवल, तिथं इतरांना जाण्याचा अधिकार आहे. पण पण जमाव प्रक्षुब्ध असताना त्या ठिकाणी जाणं योग्य नाही. त्या ठिकाणी शब्दाने शब्द वाढतात. परंतु तरी एक व्यक्ती तिथं गेली, बहेर पडताना ही घटना घडली, घडायला नको होती.
दोन्ही बाजूनी एफआयआर झाली आहे पोलिस चौकशी करतील, कोणाची चूक आहे, कोण जबाबदार आहे ते शोधून काढतील. सीसीटिव्ही मिडीयाचे कॅमेरे त्या ठिकाणी होते, त्यामुळे सगळं बाहेर येईल. गृहमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत की याचा व्यवस्थित तपास करा. प्रत्येकाला महाराष्ट्रात सुरक्षित वाटेल असा त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो, असे अजित पवार म्हणाले आहेत.
Web Title: Ajit Pawar On Case Against Navneet Rana And Ravi Rana And Kirit Somaiya Car Attack
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..