

ajit pawar death news
esakal
Ajit Pawar Death: सकाळचे पावणे नऊ वाजले होते.. अजितदादांचं विमान अगदी पाच मिनिटांत लँड होणार होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं... परिस्थिती लँडिंग घेण्यासरखी नव्हती, त्यामुळे ते विमान घिरट्या घेत होतं. शेवटी विमानतळाच्या जवळच शेतात ते कोसळलं अन् स्फोट झाला. कामाचा माणूस अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे अजितदादा मरण पावले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले अनुभव तर फारच भीषण आणि थरारक आहेत.