esakal | अजित पवार यांचा राजकीय सन्यास?

बोलून बातमी शोधा

ajit pawar

महाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (मंगळवार) सोपवला. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता राजकीय सन्यास घेणार का? या चर्चांना उधान आले आहे.

अजित पवार यांचा राजकीय सन्यास?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणेः महाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (मंगळवार) सोपवला. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता राजकीय सन्यास घेणार का? या चर्चांना उधान आले आहे.

मुला, राजकारणापेक्षा शेती कर... सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे... काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी ते आमदारकीचा राजीनामा देणार का? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या वक्तव्याचा धागा पकडत ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

'आजच्या राजकारणाची पातळी फारच घसरली आहे. तुही राजकारणातून बाहेर पड आणि शेती कर, असा सल्ला अजित पवारांनी मुलाला दिला आहे,' खुद्द शरद पवारांनी तसे पत्रकार परिषदेत सांगितले होते. अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार राजकारणात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मावळ मतदारसंघातून दणदणीत पराभव झाला होता. त्यामुळे, अजित पवार यांनी हा सल्ला पार्थ यांनाच दिल्याचे मानले जात आहे. अजित यांना पार्थ आणि जय असे दोन मुलगे आहेत, त्यापैकी पार्थ सध्या राजकारणात आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्या आजच्या राजीनाम्यानंतर ते राजकीय सन्यास घेणार का? पुढे त्यांची काय भूमिका असणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.