मुंबई - भारतात जपानने मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून, महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांच्यासाठी उद्योगपूरक वातावरण निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याने यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेवेळी केले.