'रिफायनरीवरुन ठाकरे गटातील आमदार-खासदारांमध्ये मतभिन्नता', अजित पवारांनी उपस्थित केला मुद्दा

Ajit Pawar News
Ajit Pawar Newsesakal
Updated on

Ajit Pawar News : बारसु रिफायनरीवरुन सध्या राज्यात वातावरण तापलेलं आहे. आज या प्रकल्पासाठी जमिनीचं सर्वेक्षण सुरु झालं, परंतु आंदोलकांनी कडाडून विरोध केला. शेवटी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सरकारने आंदोलकांशी सहानुभूतीपूर्वक चर्चा करावी. प्रकल्प खरंच धोकेदायक असेल तर त्याला विरोध ठिक आहे, प्रकल्पामुळे कुठलंही नैसर्गिक ऱ्हास होणार नसेल आणि आर्थिक सुबत्ता येणार असेल तर नक्कीच विरोध होऊ नये.

रिफायनरीवरुन ठाकरे गटातील आमदार, खासदारांमध्येच मतभिन्नता असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी राजन साळवी यांची भूमिका वेगळी असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

  • सरकारने स्थानिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात

  • प्रकल्पामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतील

  • प्रकल्पामुळे फायदा होणार असेल तर त्याचा विचार केला पाहिजे

  • कायमस्वरुपी नुकसान होणार असेल तर विरोध ठीक आहे

  • पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल, मासेमारी, पर्यटन यावर परिणाम होणार नसेल

    तर विरोध करणाऱ्यांना समजून सांगावं

  • सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवावी

  • ठाकरे गटातील आमदार, खासदारांमध्ये प्रकल्पावरुन मतभिन्नता आहे

  • राजन साळवी यांची भूमिका वेगळी आहे

  • प्रकल्पामुळे पिढ्यांचं नुकसान होणार नसेल तर विरोध असू नये

  • परराज्यातल्या लोकांनी तिथे जमिनी घेतल्या असतील तर चौकशी करावी

  • जमीन, पाणी आणि शेतीचं नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा आहे

  • कुठल्याही प्रकल्पामुळे भोपाळची पुनरावृत्ती होता कामा नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com