esakal | कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी मार्गदर्शनाची गरज - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

कोकणात पर्यटनाला चांगला प्रतिसाद कसा देता येईल, यासाठीच मार्गदर्शनाची गरज आहे.

कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी मार्गदर्शनाची गरज - अजित पवार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिंधुदुर्ग - जगभरातून अनेक लोक गोव्याला पर्यटनासाठी येतात. यासोबतच या सर्व पर्यटकांनी कोकणातही यायला हवे. कोकणात पर्यटनाचा प्रतिसाद कसा वाढवता येईल, यासाठीच मार्गदर्शनाची गरज आहे. पर्यटन मंत्री आणि इतर सहकारी यांनी यावर विचार करावा. या विमानतळाचा इतिहास मोठा आहे. यामध्ये अनेकांचे योगदान आहे, ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: Live: ठाकरे आणि राणे आले एकत्र मला आठवले युतीचे गाणे - रामदास आठवले

ते म्हणाले, कोणत्याही भागातील व्यक्ती कोकणात रमून जातो. कारण कोकणचे सौंदर्य भुरळ सर्वांना पाडते. मात्र या चिपी विमानतळाच्या दोन्ही बाजूला साडेतीन किलोमीटरचा रणवे होऊ शकतो. तो प्रवाशांना उपयोगी पडेल. या ठिकाणापासून कुडाळ 24 किलोमीटर आहे. मालवण 12 किलोमीटर आहे, त्यामुळे कोकणच्या विकासाची वाटचाल निश्चितपणे सुरू होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: Live: इथला विकास कुणी केला हे लोकं सांगतील - राणे

पुढ ते म्हणाले, या विमानतळाच्या नाईट लँडिंगविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकीर यांच्यासंदर्भात चर्चा झाली आहे. गोवा-मुंबई हायवे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला आहे. परंतु रत्नागिरी, रायगडमध्ये झालेला नाही. ते काम रखडले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. हा रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्टकांना कोकणात येण्यासाठी मदत होणार आहे. याबातीत मंत्री नितीन गडकरी यांनी मला आर्थिक जबाबादारी उचलू असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

loading image
go to top