
'सहसा छोटे पक्ष...' अजित पवारांनी मांडलं राज्यसभेच्या सहाव्या जागेचं गणित
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा जागा आहेत. दोन जागा भाजपच्या आहेत. काही मतं शिल्लक राहतात. शिवसेनेनेही एक जागा निवडून आणल्यावर काही मत शिल्लक राहतात. राष्ट्रवादीचीही कही मतं शिल्लक राहतात. आम्हाला एक जागा असताना पवार साहेब शब्द म्हणून उद्धव साहेबांनी त्यांचा कोटा दिला. पवार साहेबांनी कबूल केलं होत. पुढच्या वेळी करू, असं त्यांनी म्हटलं होतं. (Ajit Pawar News)
येत्या ४ जुलैला राज्यातील सहा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यासाठी १० जूनला निवडणूक होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील पाच जागांवर उमेदवार अंतिम टप्प्यात आहेत. मात्र सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजे यांनी घोषित केलं. (Ajit Pawar on Rajyasabha Seats)
यानंतर आकड्यांचं समीकरण जुळवण्यात सर्व पक्षांची धावपळ सुरू आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडून राजेंना पाठिंबा दिला आहे. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाटेच्या सर्वाधिक जागा असल्याने त्यांनी या जागेवर दावा सांगितला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना मतदान करता येईल, अशी सेनेकडून ऑफर गेल्याची चर्चा आहे.
विरोधी पक्षाकडून फोडाफोडीचं भ्रष्ट राजकारण सुरू झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र, उघड मतदान असतं, आणि फुटाफूटीचे प्रकार होत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.
माझं अनुभव आहे सहसा छोटे पक्ष सत्ताधारी पक्षाचे ऐकतात. बघुया काय होतं, असं अजित पवार म्हणाले. पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता, असं अजित पवार म्हणाले.