

angar nagar panchayat
esakal
Ujjwala Thite: सोलापुरातल्या अनगर नगर पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राज्यभर चर्चेत आलेल्या उज्वला थिटे यांनी गुरुवारी अधिकृतपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वतः अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाषणात त्यांनी लाडकी बहीण म्हणून उज्वला थिटेंचा उल्लेख केला आणि कायम त्यांचं रक्षण करणार असल्याचं म्हटलं.