अजित पवारांनी पदभार स्वीकारला; भाजपनेत्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला असल्याचे सांगितले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला असल्याचे सांगितले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गिरीश महाजन यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्याचे ट्विट केले आहे. महाजन म्हणतात, महाराष्ट्राच्या विकासासाठी व स्थिर सरकार मिळावे म्हणून एकत्र येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी शपथ घेऊन पदभार स्वीकारला आहे. त्या दोघा नेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन !

दरम्यान, शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज फडणवीस यांनी पदभार स्वीकारला परंतु अजित पलार यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे भाजपनेत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता गिरीश महाजन यांनी ट्विट करत अजित पवार यांनी पदभार स्वीकारला असल्याचे सांगत या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar takes Charge of office inform girish mahajan