esakal | मतविभाजन नकोय.. म्हणून राज ठाकरेंशी चर्चा करू : अजित पवार

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

समविचारी पक्षांना एकत्र आणायला हवे. महाआघाडीतील पक्षातील उमेदवारांचे त्या-त्या पक्षांनी काम केले पाहिजे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी प्रफुल्ल पटेल चर्चा करणार आहेत. राज ठाकरेंसोबत चर्च करून मार्ग काढू.

मतविभाजन नकोय.. म्हणून राज ठाकरेंशी चर्चा करू : अजित पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महाआघाडीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

विद्यमान खासदारांची जागा कोणताही पक्ष सोडत नाही, इतर जागा सोडण्याबाबत विचार केला जातो. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. मनसेनेसुद्‌धा गेल्या वेळी एक लाख मतं घेतली होती. त्यामुळे शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी मनसेनेदेखील महाआघाडीत एकत्र आले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्यानंतर आता त्यांनी महाआघाडीबाबत वक्तव्य केले आहे. 

अजित पवार म्हणाले, की समविचारी पक्षांना एकत्र आणायला हवे. महाआघाडीतील पक्षातील उमेदवारांचे त्या-त्या पक्षांनी काम केले पाहिजे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी प्रफुल्ल पटेल चर्चा करणार आहेत. राज ठाकरेंसोबत चर्च करून मार्ग काढू. प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करू. 20 फेब्रुवारीला मित्रपक्षातील सर्व नेते सभेला हजर राहणार, ही सभा नांदेडमध्ये होईल.