राष्ट्रवादीला नेत्यांच्या पळवापळवीची भीती? अजित पवार सावध; कार्यकर्त्यांना म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

राष्ट्रवादीला नेत्यांच्या पळवापळवीची भीती? अजित पवार सावध; कार्यकर्त्यांना म्हणाले...

Ajit Pawar: शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. एका मराठी न्युज वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे बारा आमदार आमच्या संपर्कात असून एक मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केलं आहे.

ते म्हणाले सगळं ठरलं आहे फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. याशिवाय सोलापूर जिल्हयातील आणखी एक बडा नेता देखील आमच्याकडे येणार आहे. त्यामुळं राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांनंतर शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पदधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: शहाजीबापू पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ; 'या' दिवशी जाहीर सभा

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

ते म्हणाले “ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवली जात आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका. जे नेते पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होतोय. त्यांना वाटतं जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही" असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.

टॅग्स :Ajit PawarNCP