कामे वेळेत पूर्ण न केल्यास कारवाई; अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 February 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम-पवनार-वर्धा विकासांतर्गत सुरु करण्यात आलेली कामे २ ऑक्‍टोबरपूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकऱ्यांना शनिवारी दिला. 

मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम-पवनार-वर्धा विकासांतर्गत सुरु करण्यात आलेली कामे २ ऑक्‍टोबरपूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकऱ्यांना शनिवारी दिला. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

ही कामे दर्जेदार होतील याकडे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींनी व्यक्तिशः: लक्ष घालावे, अशी सूचनाही त्यांनी केली. सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्र्यांनी वर्धा, सेवाग्राम व पवनार परिसराचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन विकासकामांना वेग द्यावा. कर्तव्यात कसून करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत दिला. यावेळी ‘गांधी फॉर टुमॉरो' या गांधी विचार संशोधन व संसाधन केंद्रासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. 

अधिकारी पश्‍चिम बंगालला जाणार 
अवैध ऑनलाइन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. यासंदर्भात पश्‍चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी पोलिस व अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाठवून माहिती घेण्यात यावी, असे निर्देश अजित पवार यांनी आज दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar warns to officer Action to take if the task is not completed in time