Sunil Tatkare
sakal
मुंबई - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘राष्ट्रवादी’ मासिकात राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी तीव्र आक्षेप घेतला. शशिकांत शिंदेंनी चुकीच्या माहितीच्या आधारावर अजित पवार यांच्या निर्णयांचा अर्थ लावल्यास, पक्ष योग्य त्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा दिला आहे.