

Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे वादात अडकल्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. गुरुवारी पहिल्यांदाच अजित पवार हे बीडमध्ये दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते डीपीडीसीची बैठक घेत आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.