रायगडमधील 'त्या' बोटींबाबत फडणवीसांनी दिली कन्फर्म माहिती; म्हणाले...

कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या या बोटींमध्ये तीन AK-47 रायफल्स आणि अॅम्युनिशन आढळून आलं आहे.
fadnvis
fadnvis
Updated on

मुंबई : कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या बोटींमध्ये तीन AK-47 रायफल्स आणि अॅम्युनिशन आढळून आलं आहे. ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असून बोटचं इंजिनात बिघाड झाल्यानं ही बोट भरकटली आणि भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आली. प्रथमदर्शनी यामध्ये कुठलंही दहशतवादी लिंक दिसून आलेली नाही. याचा तपास सुरु असून सर्वत्र अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (AK47 Rifle carring boat owned by an Australian woman Fadnavis gave imp info in Vidhan Sabha)

फडणवीस म्हणाले, याबाबत कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांना तात्काळ याची माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या बोटीचं नाव 'लेडी हान' असं असून या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्सगन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान असून ही बोट मस्तकहून युरोपकडे जाणार होती. २६ जून २०२२ रोजी सकाळी १० च्या सुमारास या बोटीचं इंजिन निकामी झालं. त्यानंतर यावरील खालाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर १३ वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेनं बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानकडे सुपूर्द केले. पण समुद्र खवळलेला असल्यानं लेडी हान या बोटीला टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळं ही बोट भरकट भारतीय किनाऱ्याला लागली.

सगळीकडे अलर्टची घोषणा

या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोन्ही मिळून करत आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. तसेच भारतीय कोस्टगार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क सुरु असून बारकाईनं पुढील तपास करण्यात येत आहे. ही माहिती प्राप्त झाली असली तरी कुठेही यामध्ये कमी राहू नयेसाठी सगळीकडे नाकाबंदीचे आदेश दिले आहेत, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

आदिती तटकरे यांनी उपस्थित केला मुद्दा

दरम्यान, आदिती तटकरे यांनी विधानसभेत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, उत्सवाच्या काळात रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर चाकरमनी दाखल होतात. जर तिथं रायगड पोलीस कमी पडत असतील तर पोलिसांची कुमक वाढवावी. तसेच उत्सवांच्या काळात इथं अडथळा येऊ नये याची खात्री शासनानं करावी. तटकरे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ही कन्फर्म माहिती असली तरी सर्व उपाययोजना केल्या जातील. पूर्ण काळजी घेतली जाईल. एटीएस देखील इथं लक्ष घालतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
IMD predicts heavy rainfall
State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
Marathi News Esakal
www.esakal.com