esakal | सोशल मीडियावर भाजपच झालंय ट्रोल, कोरोनाशी लढण्यात महानगरपालिकेला अपयश
sakal

बोलून बातमी शोधा

Akola BJP has become a troll on social media, the corporation has failed to fight Corona

शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदही भाजपकडे आहे. शहरात दोन व जिल्ह्यात चार भाजप आमदार आहेत. असे असतानाही जिल्हा कोरोना बांधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोनमध्ये आहे.

सोशल मीडियावर भाजपच झालंय ट्रोल, कोरोनाशी लढण्यात महानगरपालिकेला अपयश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :   शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदही भाजपकडे आहे. शहरात दोन व जिल्ह्यात चार भाजप आमदार आहेत. असे असतानाही जिल्हा कोरोना बांधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोनमध्ये आहे.

त्यात सर्वाधिक रुग्ण महापालिका हद्दीतील आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात मनपाला अपयश आले आहे. असे असतानाही राज्य सरकारकडे बोट दाखवून अपयशाचे खापर फोडल्या जात असल्याबद्दल भाजपचे आंदोलन सोशल मीडियातून चांगलेच ट्रोल झाले आहे. 

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका राज्य सरकारवर ठेवत भाजप नेत्यांनी अकोल्यात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ आंदोलनात सहभाग घेतला. घरच्या अंगणात हातात निशेषधाचे फलक घेवून केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह आमदार, आजी-माजी महापौर व भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी झालेत.

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या महाघाडीचे उद्धव ठाकरे सरकार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत घरी बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून कारभार चालवणाऱ्या सरकारच्या विरोधात भाजपने आज राज्यभर महाराष्ट्र बचाव अभियानांतर्गच ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ हे आंदोलन केले. त्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, मायाताई कावरे, तेजराव थोरात, किशोर पाटील, उपमहापौर राजेंद्र गिरी, गीतांजली शेगोकार, चंदाताई शर्मा, सुहासिनिताई धोत्रे, मंजुशाताई सावरकर, हरिनारायण माकोडे आदींनी सहभाग घेतला.

९०० गावातील १२ हजार कुटुंबांचा सहभाग
राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनात जिल्ह्यातील ९००गावांतील १२४३२ कुटुंबातील सुमारे ६२१५० नागरिकांनी या आंदोलनात सहभागी घेतला. भाजपच्या आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त समर्थन मिळाल्याचा दावा भाजप प्रवक्ते गिरीश जोशी यांनी केला.

loading image