Breaking ! कोरोनावरील लस टोचून घेणाऱ्या मद्यपींना सोडावी लागणार चार महिने दारू

तात्या लांडगे
Sunday, 17 January 2021

मद्यपींना ओळखायचे कसे? 
कोरोनाचे संकट हद्दपार करण्याच्या हेतूने प्रतिबंधात्मक लस टोचण्यास प्रारंभ झाला आहे. लसीकरणाचा पुढील टप्पा उद्या (सोमवारी) अथवा बुधवारी सुरु होणार आहे. काही दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यातील लोकांना लस टोचली जाईल. तत्पूर्वी, मद्यपींवर लसीचा प्रभाव राहावा, त्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून त्यांनी लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर किती दिवस दारु पिऊ नये, असे सूत्र ठरविण्यात आले आहे. मात्र, मद्यपी कसा ओळखायचा हा पेच निर्माण झाल्याने संशयितांकडून लसीकरणावेळी दोन महिने मद्यपान करणार नाही, असे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे. लसीचा साईड इफेक्‍ट नाही, परंतु लस दिल्यानंतर त्याचा परिणाम मद्यपींवर होईल की नाही, याबाबत स्पष्टपणे सांगणे कठीण असल्याने मद्यपींना आवाहन केले जात आहे.
 
सोलापूर : मद्यपान करणाऱ्यांना तुर्तास लस टोचली जाणार नाही. मात्र, लसीकरणापूर्वी दोन महिने आणि लसीकरणानंतर दोन महिन्यांपर्यंत मद्यपींनी मद्य प्राशन करु नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, लसीकरणावेळी त्यांना शपथपत्र द्यावे लागणार आहे.

'यांना' तुर्तास लस टोचली जाणार नाही
बाळाला अंगावर पाझणाऱ्या (स्तनदा) माता, 18 वर्षांखालील मुलांना तुर्तास कोरोनाची लस दिली जाणार नाही. दुसरीकडे मद्यपींना लसीकरण करण्यापूर्वी त्याने दोन महिने अगोदर व लसीकरणानंतर दोन महिने मद्यपान करु नये.
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

राज्यातील सुमारे दिड कोटी लोकांना सुरवातीला लस टोचली जाणार आहे. त्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनवरील पोलिस, महापालिका, जिल्हा परिषद व महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना आणि शेवटी 50 वर्षांखालील को- मॉर्बिड रुग्णांना लस दिली जाईल. मात्र, लहान बाळाला दुध पाजणाऱ्या स्तनदा माता व 18 वर्षांखालील मुलांनाही लसीकरणातून तुर्तास वगळण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील 19 लाख 89 हजार व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 50 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, त्यात बहुतांश रुग्णांचे वय 60 वर्षांहून अधिक असून बाधितांमध्ये 31 ते 50 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आहेत. 0 ते 15 आणि 16 ते 30 या वयोगटातील रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर 18 वर्षांखालील मुलांना तुर्तास लस दिली जाणार नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर स्तनदा मातांना प्रसुतीनंतर सहा ते आठ महिन्यांपर्यंत कोरोनाची लस टोचली जाणार नाही, असेही सांगण्यात आले.

मद्यपींना ओळखायचे कसे? 
कोरोनाचे संकट हद्दपार करण्याच्या हेतूने प्रतिबंधात्मक लस टोचण्यास प्रारंभ झाला आहे. लसीकरणाचा पुढील टप्पा उद्या (सोमवारी) अथवा बुधवारी सुरु होणार आहे. काही दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यातील लोकांना लस टोचली जाईल. तत्पूर्वी, मद्यपींवर लसीचा प्रभाव राहावा, त्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून त्यांनी लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर किती दिवस दारु पिऊ नये, असे सूत्र ठरविण्यात आले आहे. मात्र, मद्यपी कसा ओळखायचा हा पेच निर्माण झाल्याने संशयितांकडून लसीकरणावेळी दोन महिने मद्यपान करणार नाही, असे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे. लसीचा साईड इफेक्‍ट नाही, परंतु लस दिल्यानंतर त्याचा परिणाम मद्यपींवर होईल की नाही, याबाबत स्पष्टपणे सांगणे कठीण असल्याने मद्यपींना आवाहन केले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcoholics will not be vaccinated immediately. However, alcoholics should not consume alcohol for two months before vaccination and for two months after vaccination