देवेंद्र फडणवीसांकडून सर्व कार्यकम रद्द; तातडीनं दिल्लीकडे रवाना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fadnvis

देवेंद्र फडणवीसांकडून सर्व कार्यकम रद्द; तातडीनं दिल्लीकडे रवाना!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर फडणवीस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी तातडीनं रवाना झाले आहेत. यासाठी त्यांनी आजच्या आपल्या सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (All events canceled by Devendra Fadnavis Leave for Delhi urgently)

फडणवीस यांच्याकडून मंत्रालयात दुपारी १ वाजता आढावा बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यांनी अचानक आपली बैठक रद्द केली. काही आमदारांच्या भेटीगाठी सुद्धा ते घेणार होते पण या भेटीही त्यांनी रद्द केल्या. त्यानंतर सागर या आपल्या बंगल्यावर पोहोचत ते दिल्लीकडे रवाना झाला.

राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावर दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद झाला, यावेळी कोर्टानं ही सुनावणी पुढे ढकलत येत्या ८ ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित केलं. दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाच्या प्रकरणावर निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय देऊ नये, असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिले.

मंत्रिमंडळ विस्तार रखडला

दरम्यान, प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या महिन्याभरापासून रखडलेला आहे. त्यातच हा विस्तार उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी शिंदे गट आणि भाजपकडून ज्यांना मंत्रिपदं दिली जाणार आहेत त्यांच्या नावांची यादीही समोर आली आहे. या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस दिल्लीकडे पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्या सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला, असल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.