esakal | अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये ! मदत- पुनर्सवसनकडून 339 कोटी; 'या' दोन जिल्ह्यात एकही मृत्यू नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

ठळक बाबी... 

 • राज्यातील एकूण साडेदहा लाखांवरील रुग्णांपैकी आतापर्यंत सव्वादहा हजार व्यक्‍तींचा झाला मृत्यू 
 • 25 जूनपासून राज्यातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; दररोज पाच ते आठ हजारांची भर 
 • मुंबईत सर्वाधिक रुग्ण अन्‌ मृत्यूही पाच हजारांहून अधिक; ठाणे, पुणेही रुग्णसंख्येत अव्वल 
 • रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरात सोलापूर शहर राज्यात अव्वल; 16 ते 26 जुलै पुन्हा कडक लॉकडाउन 
 • भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील एकाचाही नाही मृत्यू; वर्ध्यात सर्वात कमी रुग्णसंख्या 
 • जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या मागणीबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य कार्यकारी समितीची नियुक्‍ती 

अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये ! मदत- पुनर्सवसनकडून 339 कोटी; 'या' दोन जिल्ह्यात एकही मृत्यू नाही 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर :  राज्य सरकारने 'मिशन बिगिन अगेन' सुरु करीत लॉकडाउन शिथिलतेचा निर्णय घेतला. मात्र, नागरिकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होऊ लागल्याने रुग्णसंख्या आटोक्‍यात आलेली नाही. दरम्यान, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने आतापर्यंत 339 कोटींचा निधी विविध जिल्ह्यांसाठी वितरीत केला आहे. 

कोरोना टेस्ट झालेल्या राज्यातील सुमारे साडेतेरा लाख व्यक्‍तींपैकी अडीच लाखांहून अधिक व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. सद्यस्थितीत अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये पोहचला असून ऍक्‍टिव्ह रूग्णांची संख्या एक लाखांवर आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. राज्यातील अडीच लाखांवरील रुग्णांपैकी एक लाख 3 हजार 516 रुग्णांवर (12 जुलैपर्यंत) विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोकण, औरंगाबाद व नागपूर विभागातून कोरोनासाठी निधीची मागणी वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा कडक लॉकडाउन करण्यात आला असून त्याठिकाणी रॅपिड ऍन्टीजेन टेस्टवर भर दिला जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत होऊन मृत्यूची संख्या आटोक्‍यात येण्याची आशा आहे. तर दुसरीकडे निधीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य कार्यकारी समितीही नियुक्‍त करण्यात आली आहे. 

आतापर्यंत 339 कोटींची मदत वितरीत 
राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार आतापर्यंत राज्यातील सर्वच विभागांसाठी 339 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विविध जिल्ह्यांकडून मागणी वाढत असून त्यावर निर्णय घेण्यासाठी कार्यकारी समितीच्या बैठका होतात. तत्पूर्वी, जिल्हा नियोजन समिती व आरोग्य विभागाकडूनही वस्तू व रोख रकमेच्या स्वरुपात मदत देण्यात आली आहे. 
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई 