"हा शेतकऱ्यांचा विजय आहे", मोदींच्या घोषणेवर मलिकांची प्रतिक्रिया | Nawab Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"हा शेतकऱ्यांचा विजय आहे", मोदींच्या घोषणेवर मलिकांची प्रतिक्रिया

"हा शेतकऱ्यांचा विजय आहे", मोदींच्या घोषणेवर मलिकांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : “पंतप्रधान मोंदींनी देशाला संबोधित करताना कृषी क्षेत्रात काय कामगिरी केली त्याची माहिती दिली. त्यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. वर्षभरापासून या देशातील शेतकरी लढत होते, त्यांनी आपले प्राण गमावले. शेतकऱ्यांनी प्राणांची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या चढवून त्यांची हत्या केली. शेतकऱ्यांना खालीद आणि देशद्रोही या नावाने पुकारण्यात आलं. तरी देशातील शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला. हा शेतकऱ्यांचा विजय आहे”, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

“सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही. उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणुका पुढे आहेत. त्यामुळे त्यांना कळालं की आता या देशात परिवर्तन होणार आहे. आज जो निर्णय झालाय तो शेतकऱ्यांचा विजय आहे”, असंही ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे, जो स्वागतार्ह निर्णय आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मोदी सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत हीच पक्षाची स्पष्ट भूमिका होती. अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली

शेतकरी हिताला प्राधान्य

आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे. असे मोदी म्हणाले

काय म्हणाले मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.

loading image
go to top