पंढरपूर - शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिलीभगत आहे. भाजला सोडून ते कधीही बाहेर पडू शकत नाहीत. पंधरा दिवस थांबा, देशाच्या राजकारणात एक नवीन मोठी घडामोड झाल्याची बातमी समजेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरात केला.