इथून पुढच्या सर्व निवडणूका भाजपच्या झेंड्याखालीच ; धनंजय महाडिक : -Dhananjay Mahadik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Mahadik

सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात अटीतटीची लढत होणार असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालं होतं.

इथून पुढच्या सर्व निवडणूका भाजपच्या झेंड्याखालीच ; धनंजय महाडिक

मी भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या आदेशानुसार मी निवडणूकीसाठी सामोरे गेलो. आणि आज त्यांच्याच आदेशाने माघार घेत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा आदेश दिला. त्यानुसारच मी निवडणूकीतून माघार घेत असल्याचं अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी सांगितलं. तर इथून पुढच्या सर्व निवडणूका भाजपच्या झेंड्याखालीच लढवणार असे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोल्हापूरमधून काँग्रेसने पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी तर भारतीय जनता पक्षाकडून येथून अमल महाडिक रिंगणात होते. यामुळे सतेज पाटील (Satej Patil) आणि अमल महाडिक यांच्यात अटीतटीची लढत होणार असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालं होतं. यावरून एकमेकांविरूध्द आरोप - प्रत्योरोप सुरू होते. धनंजय महाडिकांनी(Dhananjay Mahadik फिल्डिंग लावली होती. मात्र आज अचानक माघार घेतल्याने जिल्ह्यात चर्चेला उधान आले आहे.

हेही वाचा: दिल्लीतून आदेश आला अन् माघार घेतली - धनंजय महाडिक

न्यायालयात तक्रार करणार ;महाडिक

पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपल्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या शपथपत्रामध्ये स्थावर मालमत्तेची आणि कर्जाची माहिती लपवली आहे. त्यांनी महापालिकेचा घरफाळाही थकवला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हे चुकीचे आहे. त्यामुळे सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध आहे. असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला होता. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार असून निवडणूक आयोगाकडेही याची तक्रार करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले होते.

माघार घेताच धनंजय महाडिक काय म्हणाले.

यावर आज माघार घेतल्यानंतर धनंजय महाडिक म्हणाले, मडाडिक कुटुंबाचे वर्चस्व होतं आहे आणि भविष्यातही राहणार. यापूर्वी आम्ही महाडिक गट म्हणून निवडणूक लढवत होतो. आता आम्ही सर्व कुटुंब भारतीय जनता पार्टीमध्ये सहयोगी सभासद आहोत. त्यामुळे पक्ष आदेश मानने हे आमचे कर्तव्य आहे. इथून पूढे सर्व निवडणूका भाजपच्या झेंड्याखाली लढवणार असेही ते म्हणाले.

जिल्हा बँक निवडणूकडे आता लक्ष

विधान परिषदेचे रणांगण सुरू असतानाच आता जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे . विधान परिषदेनंतर बँकेची निवडणूक होईल अशी शक्यता बाळगून असलेल्या जिल्ह्यातील नेतृत्‍वाचा यानिमित्ताने कस लागणार आहे. परिणामी विधान परिषदेचे पडसादही या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेचे नेतृत्‍व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ करत आहेत. आता विधान परिषदेतून महाडिकांनी माघार घेताच बँकेच्या निवडणूकीत आपला जम बसवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top