
अंबाबाई,जोतिबा मंदिरात लहानग्यांना प्रवेश; जाणून घ्या नवी नियमावली
कोल्हापूर : कोरोना (Corona) रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी जेष्ठांना आणि लहान मुलांना परवानगी नाकारण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांनी जेष्ठांना परवानगी मिळाली. पण, लहान मुलांना परवानगी मिळाली नव्हती. मध्यंतरी अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर (Ambabai, Jyotiba Temple) येथे आलेल्या भाविकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर येथे लहान मुलांना दर्शनासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दर्शनासाठी ई पास ची अट घालण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे (Shivraj Naikwade) यांनी दिली. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्याचे ही त्यांनी सांगितले.
अशी आहे नियमावली
अंबाबाई मंदिरात गाभारा दर्शन आणि मुख दर्शन यासाठी वेगवेगळ्या रांगा असतील.
महाद्वार चौक ते गरुड मंडप येथून मुखदर्शनाची सोय करण्याचे नियोजन आहे.
कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता दिल्यामुळे लहान मुलांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
मुख दर्शनासाठीही ई पास आवश्यक आहे.
रोज किमान साठ हजार भाविकांना दर्शनासाची सोय करण्याचे नियोजन.
Web Title: Ambabai Jyotiba Temple Kolhapur Corona Rules Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..