राज्य विधिमंडळाच्या ३० जूनला सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात गुरुवारी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात आला. विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला अंतिम आठवडा प्रस्तावामार्फत घेरण्याच्या तयारीत आहेत..विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करताना राज्यातील विविध गैरव्यवहार, आमदारांची असंवेदनशील वर्तणूक , निविदा प्रक्रियेत अनियमितता,कर्जमाफी,राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारला आलेले अपयश आदी विषय मांडत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.सत्ताधारी पक्षातील लोक अनेक गुन्ह्यात सहभागी असून महिला अत्याचारातही सत्ताधारी पुढे आहेत. राज्यात गुत्तेदार आणि दरोडेखोर यांचे राज्य आले असून कोणत्याच गुन्हेगारांवर कारवाई होत नसून कायद्याचे पालन होत नसल्याबाबत दानवे यांनी गृह खात्यावर ताशेरे ओढले..मागील पाच महिन्यांत १ लाख ६० हजार गुन्हे राज्यात घडले. ९२४ हत्या झाल्या असून दररोज ६ हत्या होतात. तर ३ हजार ५०६ बलात्कार झाले. या घटनांमध्ये जवळचे लोक एवढी हिंमत का करतात? असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात १० हजार ४०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे अनेक मोठे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रिय असून भाईगिरी सुरू आहे. पुण्यात सर्वांत जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली..राज्य सरकारने उत्पादन शुल्क विभागाचे नियम बदलण्याचा घाट घातला आहे. १९७२ पासून बंदी असलेले मद्य विक्री परवाने नव्याने सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकार ३२८ परवाने देत असून सत्ताधारी आमदारांना विदेशी दारू दुकानाचे परवाने देण्याची योजना आखत आहे का? असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दांत त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. स्पर्धक कंपनीपेक्षा तीन हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे बोरिवली बोगद्याचे काम देणे, ही बाब योग्य नसल्याचेही दानवे यांनी सांगितले..अंबादास दानवे म्हणाले...सत्तेत असणारे कधीतरी भ्रष्टाचाराविरोधात बोलत होतेसत्ताधारी आमदारांचे वर्तन कसे आहे, हे देखील पाहिलेसत्ताधारी पक्षातील लोकच गुन्ह्यांत सामील आहेतहे सरकार कायदा व्यवस्था राखण्यास अपयशी ठरलेयराज्यात रोज २३ बलात्कार होताहेतवैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा हात आहे.मुंबई मनपामध्ये मॅन्युअल मध्ये नसताना फायर सेफ्टीची तीन हजार कोटींची निविदा दिली जात आहेनवीन मद्याचे परवाने सरकार देणार आहेदुप्पट दराने व्हॅन खरेदी केल्या जाताहेतएका कामात २९ कोटी रुपये रोख घेतले (परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप)ईडी चौकशी सुरू असलेल्या व फडणवीस यांनी काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला पुन्हा कामे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.