Ambernath: घशात मासा अडकून ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambernath A 6 month old baby died of a fish stuck in his throat

Ambernath: घशात मासा अडकून ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत

अंबरनाथमध्ये घशात मासा अडकून 6 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त होतेय. अंबरनाथमधील उलन चाळ परिसरात ही घटना घडली. खेळता खेळता बाळाने तोंडात टाकला मासा, श्वास अडकल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (Ambernath A 6 month old baby died of a fish stuck in his throat)

शहबाज असं या सहा महिन्याच्या बाळाचे नाव आहे. गुरुवारी रात्री शहबाज घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत होता. तेवढ्या खेळता खेळता तो अचानक रडू लागला. त्यामुळे इतर मुलांनी शहबाजच्या पालकांना याची माहिती दिली. शहबाजची आई आणि वडिलांनी शहबाज खेळत असलेल्या ठिकाणी धाव घेतली.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

काही केल्यानं शहबाज शांतच होईना. त्यामुळे दोघांनीही त्याला घेऊन एक खाजगी रुग्णालय गाठलं. पण तिथे शहबाजला नेमकं काय झालंय हेच डॉक्टरांच्या लक्षात येईना. त्यामुळे शहबाजच्या आई-वडिलांनी त्याला घेऊन उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठलं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

डॉक्टरांनी शहबाज याला तपासलं, त्यावेळी त्याच्या घशात मासा अडकल्याचं आणि त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. हा मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढला. यानंतर आता सकाळी या बाळाचं शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण शोधून काढलं जाणार असल्याची माहिती शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

टॅग्स :ambernath