Amit Deshmukh : काँग्रेसच्या पडझडीच्या काळात अमित देशमुखांनी घेतली ठोस भूमिका; म्हणाले, विलासरावांनाही...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांबद्दलही उलटसुलट चर्चा होत आहेत. त्यातच काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी ठोस भूमिका जाहीर केली आहे.
Amit Deshmukh
Amit Deshmukh esakal

मुंबईः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांबद्दलही उलटसुलट चर्चा होत आहेत. त्यातच काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी ठोस भूमिका जाहीर केली आहे.

लातूरमध्ये स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृतीसोहळ्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी अमित देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्येच बरा आहे. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. यावेळी त्यांनी स्व. विलासराव देशमुखांची एक आठवणदेखील शेअर केली.

अमित देशमुख म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख यांच्यावरही काँग्रेस पक्षाने कावाई केली होती. त्यांना बेदखल करण्यात आलेलं होतं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, मला कुणी पक्षातून काढेल पण माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार?, असं उत्तर दिलं होतं. ही आठवण अमित देशमुखांनी शेअर केली.

दरम्यान, आपल्याला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या काळामध्ये जशी परिस्थिती होती, ते दिवस परत आणायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या विचारांशी ठाम राहावं, असा विश्वास अमित देशमुखांनी बोलून दाखवला.

Amit Deshmukh
Aaditya Thackeray : 'रात्रीच्या शेतीत मुख्यमंत्री काय पिकवतात?' आदित्य ठाकरेंचा सवाल; ठाण्यातून दिलं 'हे' आव्हान

लातूरमध्ये रविवारी स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला देशमुख कुटुंबाची हजेरी होती. तसेच यावेळी राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी रितेश देशमुख भावुक झाल्याचं बघायला मिळालं.

Amit Deshmukh
Crime News: खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कॉलेज तरुणीचा विनयभंग

काय म्हणाले रितेश देशमुख?

''साहेबांना (विलासराव देशमुख) जाऊन आज जवळपास 12 वर्ष झाली. त्यांची उणीव नेहमीच भासते. पण ही उणीव आम्हाला कधी भासू नये म्हणून आमचे काका नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले. काकांना मला हे सांगता आलं नाही, पण मी आज सर्वांसमोर त्यांना सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर तुम्ही पाहू शकता.'' असं म्हणत रितेश यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com