दसरा मेळाव्याला अमित शहा भगवान गडावर 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

अमित शहा हे मंगळवारी (ता. 8) तारखेला दसरा मेळाव्या निमित्त बीड येथील भगवान भक्‍ती गडावर उपस्थित राहणार आहेत.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. 8) तारखेला दसरा मेळाव्या निमित्त बीड येथील भगवान भक्‍ती गडावर उपस्थित राहणार आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शहा यांना निमंत्रण दिले आहे. यावेळी महायुतीच्या उमेदवारांचा मराठवाडयात प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

भगवान भक्‍ती गड, सावरगाव, ता. पाटोदा, जिल्हा बीड येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, डॉ. संजय कुटे, जयकुमार रावळ, अतुल सावे आदी उपस्थित राहणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah will be present at Bhagwan Gad at Beed for the Dussera rally