'आता तरी तोंड...', भाजपा नेत्याच्या वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरींचा भाजपला सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhanshu Trivedi

'आता तरी तोंड...', भाजपा नेत्याच्या वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरींचा भाजपला सवाल

Sudhanshu Trivedi: राहुल गांधींनी सावरकरांवरती केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ या वृत्तसंस्थेने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले की, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला.

त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य चर्चासत्रात बोलताना सुधांशु त्रिवेदी यांनी केलं आहे. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Sudhanshu Trivedi: “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपला प्रश्न विचारला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की "भाजपचे प्रवक्ते सुभांषु त्रिवेदी यांच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्र लिहलं असे वादग्रस्त विधान.सावरकरांच्या पत्रांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी... भाजपचे नेते यावर तोंड उघडतील का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. आता सुधांशु त्रिवेदी यांच्या विधानामुळं राज्यात नव्या वादाल फोटणी मिळाली आहे.