"कसं आहे बसव भाऊ! आम्ही महाराजांबद्दल बोलू तुम्ही आगीत...; मिटकरींचा हल्लाबोल : Amol Mitkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari

Amol Mitkari: "कसं आहे बसव भाऊ! आम्ही महाराजांबद्दल बोलू तुम्ही आगीत...; मिटकरींचा हल्लाबोल

मुंबई : राज्यात सध्या दोन विषयांवर मोठ्या प्रमाणावर गरमागरम चर्चा सुरु आहे. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद. एकाच वेळी हे दोन्ही वाद सुरु असल्यानं त्यामागचं कारण सांगण्याचा प्रयत्न आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या वादात उडी घेणाऱ्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी हल्लाबोल केला आहे. (Amol Mitkari attack on CM Basavraj Bommai regarding Karnataka issue)

मिटकरींनी ट्विट करत म्हटलं, "कसं आहे बसवभाऊ, आमच्या महाराष्ट्रात भाजपचे नेते बेताल बोलत सुटल्यामुळे आमची सत्ता पुढे येईल की नाही आज शंका आहे. आता याची पाठराखण शेजारधर्म म्हणून तुम्हीच कराच. इकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो तिकडे तुम्ही सीमावाद उकरुन काढत आगीत तेल टाकण्याचं काम सुरु ठेवा, ओक्के होईल"

हेही वाचा: Big March of MVA: महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात 'महामोर्चा'; मविआची मोठी घोषणा

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गरीश महाजन, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि सध्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक सुरु आहे. या फोटोवरुन त्यांनी राज्यातील भाजपवरही टीका केली आहे.

हेही वाचा: Himachal Pradesh Exit Poll 2022 : हिमाचलमध्ये 'अब की बार काँग्रेस सरकार'?; एक्झिट पोल्स जाहीर

शिवरायांबद्दल वादग्रस्त भाष्य केल्यानंतर राज्यपाल विरोधकांसह तमाम शिवप्रेमींच्या निशाण्यावर आले आहेत. त्यातच सीमावादही उफाळून आला आहे. यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातली गावं आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याचा दावा केला. त्यातच जतच्या गावांना प्रकल्पातून पाणी सोडून महाराष्ट्राल डिवचण्याचा प्रयत्नही केला होता.