
रश्मी ठाकरेंना टार्गेट करुन सोमय्यांना पराक्रम करतोय असे वाटत असेल तर...
मुंबई : सध्या किरीट सोमय्या हे दररोज शिवसेनेवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर कार्लई येथील १९ बंगाल्यांबाबत आरोप केला आहे. त्या संदर्भात सोमय्या यांनी पाहणीसाठी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावाचे सरपंच व ग्रामसेवक यांची भेट घेतली. पण येथे त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नाही. भाजप (BJP) राजकारण तापवत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन सध्या राजकारण पेटले आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मत व्यक्त केले आहे. (Amol Mitkari Attack On Kirit Somaiya Over Blame Game On Rashmi Thackeray)
हेही वाचा: मजबूत मोदी सरकारकडून भ्रष्टाचारावर मजबूत कारवाईची अपेक्षा - वरुण गांधी
मिटकर ट्विटमध्ये म्हणतात, रश्मीताई ठाकरे यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाला टार्गेट करुन किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) फार पराक्रम करतोय असे वाटत असेल तर ही फार मोठी चुक ठरेल. जी भविष्यात अख्ख्या भाजपाला महाग पडेल. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
Web Title: Amol Mitkari Attack On Kirit Somaiya Over Blame Game On Rashmi Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..