हा संविधानिक पदाचा अपमान, मोदीजी चूक दुरुस्त करा - अमोल मिटकरी

मोदीजी चूक दुरुस्त करा
Narendra Modi And Amol Mitkari
Narendra Modi And Amol Mitkariesakal

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी (ता.१४) देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण झाले. या प्रसंगी मोदी व देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही उपस्थित होते. मात्र त्यांना भाषण करु दिले गेले नाही, असा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे त्या म्हणाल्या. यावरुन आता राज्यात वाद सुरु झाला आहे. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही सदरील घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. (Amol Mitkari Criticize Narendra Modi For Not Allowed Ajit Pawar Speech At PM Function At Dehu)

Narendra Modi And Amol Mitkari
मोदी सरकार व भाजप राहुल गांधींना घाबरले कारण... : रणदीप सुरजेवाला

मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

Narendra Modi And Amol Mitkari
आणखी एक तारीख पाहू; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

आक्षेपावर देहू संस्थान स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ठरलेल्या प्रोटोकाॅलनुसार भाषण ठरले होते, असे संस्थान सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com